जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे दोघेही MBBS.
Bhairav Diwase. April 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर- चंद्रपूर शहरात अतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही आहे. तेथील प्रशासनाच्या सुचनाचं पालन काटोकोरपणे होत आहे आणि प्रशासनाची अंमलबजावणीही उत्तमरित्या होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या जनतेचं आणि प्रशासनाचं कौतुक केलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात किमान 150 चाचण्या करण्यात आल्या मात्र त्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही ही बाब चंद्रपूरकरांसाठी आनंदाची आहे. चंद्रपुरात दोन अधिकारी काटेकोरपद्धतीने नियोजन करत आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली आहे. हे दोघेही जिल्ह्याची प्रमुख पदं सांभाळत असले तरी त्यांचं शिक्षण त्यांना या लढाईत मोलाची साथ देत आहे. कारण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे दोघेही MBBS आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या सीमा सील करून बाहेरची आवक थांबवण्याचं मोठं आव्हान यशस्वीरीत्या पेललं गेलं. त्यामुळं कुणीही जिल्ह्यात येऊ शकलेलं नाही.