कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून जिल्हा निधीअंतर्गत ८६ लक्ष निधी मंजुर. जि. प अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले

Bhairav Diwase
ग्रामीण भागात सोडियम हायड्रोक्लोराईड व लॉयझाॅलच्या खरेदीकरिता २८ लक्ष तर ५८ प्रा. आ. केंद्राना माॅस्क, सॅनिटयझर व तत्सम सामुग्री खरेदीकरीता ५८ लक्ष होणार वितरित - जि. प अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची माहिती.
       Bhairav Diwase.    April 14, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: आज मंगळवार, दि. १४ एप्रिल. दिवसेंदिवस जगभरात कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज भारताच्या तुलनेत इतर देशांची स्थिती महाभयंकर आणि विदारक आहे. त्यामुळे अशी परिस्थिती भारतात येवू नये यासाठी सरकारच्यावतीने विविध उपयोजना आखल्या जात आहेत.
      अशा परिस्थितीत चंद्रपूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामीण जनता या रोगाच्या प्रसारापासुन दूर रहावी. त्यांना प्राथमिक सुरक्षा व उपचार प्राप्त मिळावा या दृष्टीने जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी मागील महिन्यात आपल्या आणीबाणीप्रसंगी प्राप्त अधिकाराचा वापर करून जि. प. पं. स. अधिनियम १९६१ चे कलम ५४ (२) नुसार जिल्हा निधीअंतर्गत ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता.
     परंतु आज राज्यात कोरोणा विषाणूच्या विळख्यात आलेल्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोणा आजारावर उपचारासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने जिल्हा निधी अंतर्गत ग्रामीण भागामध्ये गावपातळीवर ग्रामपंचायततर्फे गावामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी सोडियम हायड्रोक्लोराईड व लॉयझाॅलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला उक्त साहित्य खरेदी करण्याकरिता २८ लक्ष रुपयांचा निधी तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्याभरात कार्यरत असणार्‍या सर्व ५८ प्रा. आ. केंद्रांना त्यांच्या पातळीवर माॅस्क, सॅनिटयझर व तत्संबंधी इतर अत्यावश्यक साधनसामुग्री घेता यावी यासाठी खरेदीकरीता प्रत्येकी ०१ लक्ष रुपये प्रमाणे ५८ लक्ष रुपये पुन्हा मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि हा निधी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना लवकरचं वितरित करण्यात येणार आहे.