Top News

भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार व नगराध्यक्ष संतोषवार यांनी पंतप्रधान फंडात लोकवर्गनीतुन ३३,१०० रु केले जमा.

३३,१०० लोकवर्गणीतून गोळा करुन कोरोना ग्रस्ता करिता मदत निधी प्रधानमंत्री फंडाकरिता आयडीबीआय बँकेत जमा.
 Bhairav Diwase.   April 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना संक्रमित रुग्णाच्या संख्येत रोजची वाढ होत असल्याने . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लाँकडाउन ची घोषणा करुन आज जवळपास एक ते दिड महिना होत असून अशा परिस्थितीत देशाची व्यवस्था सुध्दा कोलमडली आहे.राज्य सरकार आणि केंद्र सरकार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गरीबांना आपआपल्या परीने सहकार्य करीत आहेत.
कोरोनाशी लढा देण्यासाठी जेवढं जमेल तेवढं सढळ हाताने मदत करावी,असं आव्हान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं त्या अनुषंगाने सावली शहरातून भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार आणि भाजपा सावली शहर अध्यक्ष तथा सावली न.प.नगरसेवक चंद्रकांत संतोषवार यांनी आपल्या देशातील परिस्थितीची जाण ठेवून सावली शहरात दि . २३ एप्रिलला १४,००० हजार आणि २४ एप्रिलला १७,००० हजार त्याचप्रमाणे ऑनलाईन २,१०० असे एकूण ३३,१०० लोकवर्गणीतून गोळा करुन कोरोना ग्रस्ता करिता मदत निधी प्रधानमंत्री फंडाकरिता आयडीबीआय बँकेत जमा करण्यात आले. ज्या देनगीदारानी यावेळी मदत केली त्यांची यादी सुद्धा पंतप्रधान मोदी व भाजपा कार्यालयाला पाठविन्यात आली आहे. यावेळेस भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार आणि चंद्रकांत संतोषवार यांनी प्रधानमंत्री फंडा करिता सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने