Top News

सावली तालुक्यात कोविड-१९ चे सर्वेक्षण.

शिक्षक,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकेमार्फत काम सुरु.
 Bhairav Diwase.   April 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: कोरोना ( कोविड19 ) च्या प्रादुर्भावामुळे जगात तसेच भारतात जनजीवन विस्कळीत झाले आहे.भारतात बहुतांश जिल्हे रेड झोन मध्ये असल्यामुळे राज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहेत. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात एकही रुग्ण पॉसिटीव्ही नाही पण खबरदारी म्हणून संचारबंदी व लॉकडाऊन  कायम आहे. बाहेर राज्यात काम करण्यासाठी गेलेले तालुक्यातील अनेक मजूर विभिन्न मार्गाने प्रवेश करीत आहेत . त्यामुळे ग्रामीण भागात अशा व्यक्तींना क्वारान्टाइन करण्यात येत आहे, बरेच जण माहिती लपवत असल्यामुळे प्रत्यक्ष अंगणवाडी सेविका, आशावर्कर आणि शिक्षक व आरोग्य सेविका ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कुटुंबात व्यक्ती किती? किती सदस्य गावात आणि गावाबाहेर राहतात, रेड झोन मधून किंवा परराज्यातून कुणी गावात आले का ? आणि कुणी बाहेर गांवावरुन आल्याची माहिती घेतल्या जात आहे. कुटुंबातील व्यक्तींना सर्दी, खोकला,ताप,दम लागणे, अशी लक्षणे आहेत का? या सर्व बाबींची माहिती सर्वेक्षणात घेतल्या जात आहे.
       चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी खबरदारी म्हणून जिल्ह्यात सर्वेक्षनाचे काम युध्द पातळी वर सुरू आहे.  या सर्वेक्षनात शिक्षक, आशा वर्कर,  अंगणवाडी सेविका,  आरोग्य कर्मचारी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने