सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे राहूल संग सोनिया यांनी थोडक्यात आटोपले लग्न.
Bhairav Diwase. April 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे दसरथजी चुधरी याची मुलगी सोनिया हिचे लग्न थेरगाव (बेलगाव) येथील राहूल बाबनवाडे सोबत दि 27/04/2020ला व्याहाड खुर्द लग्न आयोजित करून, दोन महिन्यापासून पत्रिका वाटपाचे काम पुर्ण झाले. पंरतु त्यानंतर कोरोणाचा प्रादुर्भाव एका संकटासारखे देशावर आले. आणि त्यामुळे देशात, राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी लागु झाली. अशातच असंख्य लग्न मार्च एप्रिल या महिन्यात असल्यामुळे रद्द करावे लागलेे. संचारबंदी व लॉकडाऊन मुळे लग्न कसे करायचे, असा प्रश्न मुलीचे काका दिपक चुधरी विचारात आले असता. त्यांनी डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समीती व्याहाड खुर्द याच्या कडे आपली आपबिती सांगितली. त्यावरून चुधरी, बाबनवाडे यांना बोलावून सदर कोरोना हा सगळी कडे पसरून राहिला आहे. त्यामुळे सरकार पुर्ण देश बंद ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही पार्टी कडील पाच दहा लोकांमध्ये लग्न पार पाडावे. कायदयांच पालन करणे जरूरी आहे, यानंर चुधरी, बाबनवाडे तयार झाले. आणि डॉ षडाकांत कवठे तंटामुक्त अध्यक्ष यांनी स्व:ता हजर राहून विवाह सोहळा पार पडला. पंरतु त्या नंतरचे व्याहाड खुर्दचे विवाह सोहळे पूढे करण्याचे ठरविले आहे.