Click Here...👇👇👇

बातमीची दखल घेत पोलीस स्टेशन येथे पं स सभापती, सावली विजय कोरेवार याचे दारु बंद करण्या संदर्भात पञ दाखल.

Bhairav Diwase
अवैध दारूविक्री वर बंदी घाला
 पंचायत समिती सभापतीची मागणी.
     Bhairav Diwase.  April 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतात सुद्धा याचा गंभीर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे.  त्यामध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन ,  संचारबंदी,  राज्य व जिल्हा बंदी तसेच सोशल डिस्टसिंग चे आदेश देण्यात आले. परंतु सावली तालुक्यात सर्व नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. सावली शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बनावट दारूचा महापूर असून सकाळी व सायंकाळच्या सुमारास आंबटशौकीन दारू पिण्यासाठी गर्दी करीत असतात. मात्र याकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे दृष्टीक्षेपात येते.
         अशा भयंकर परिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन चंद्रपूर जिल्ह्यात महामारीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात असताना, सावली तालुक्यात सावली शहर, तीन कवाडी, सिंगापूर, साखरी, हरम्बा, लोंढोली, घोडेवाडी,  कवठी,  कोंडेखल, किसाननगर, चांदली, व्याहाड बुज, व इतर गावात देशी-विदेशी व मोह फुलाच्या दारूची सर्रास विक्री होत आहे. दारू पिण्याकरिता वेगवेगळ्या गावातील व्यक्ती एकत्र येताना दिसतात. त्यामुळे गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने सावली तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी पोलीस स्टेशन सावली येथे निवेदनाद्वारे केली आहे.