भिसी येथील वार्ड क्र.६ येथील गरजू कुटुंबाना किराणा सहित्य मदत.
Bhairav Diwase. April 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
चिमुर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात तसेच राज्यांत संचार बंदी लागू केली, असून उद्योग धंदे व काम धंदे बंद असल्याने अनेक दररोजची मजुरी करणाऱ्या कुटुंबातील लोकांवर संकट कोसळले आहे. सरकार मार्फत राशन मिळते. परंतु जीवन जगतांना फक्त राशन च्या आधारे भागत नाही, तर इतर जीवनावश्यक किराणा साहित्याची आवश्यकता असते या गोष्टींची दखल घेत चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी भिसी येथील वार्ड क्र.६ येथील गरजू कुटुंबाना मदत केली.
भिसी येथील वार्ड क्र.६ येथील गरजू कुटुंबाना किराणा सहित्य मदत करतांना भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य श्री देवेंद्रभाऊ मुंगले,भाजपा युवा नेते भिसी ग्रा.प.सदस्य राजूभाऊ गभणे, युवा नेते आकाशभाऊ ढबाले, महेश उघडे,आशीष चिडे, अंकित उघडे, संकेत भुरके उपस्थित होते.संचारबंदी नियमांचे पालन करत साहित्य वाटप कऱण्यात आले.