Click Here...👇👇👇

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख दोघेही MBBS, धडाकेबाज प्लॅनिंग, चंद्रपुरात एकही कोरोना रुग्ण एकही कोरोना रुग्ण नाही!

Bhairav Diwase
चंद्रपुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. 
 Bhairav Diwase.    April 08, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर : कोरोना हे एक जागतिक संकट आहे. संपूर्ण जग या महामारीचा सामना (Chandrapur Collector and SP MBBS) करत आहे. महाराष्ट्रात तर हे एक युद्ध असल्याचं म्हटलं आहे. या युद्धाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहेत. मुंबई-पुण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. असं असताना तिकडे तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.
चंद्रपुरात दोन अधिकारी काटेकोरपद्धतीने नियोजन करत आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली आहे. हे दोघेही जिल्ह्याची प्रमुख पदं सांभाळत असले तरी त्यांचं शिक्षण त्यांना या लढाईत मोलाची साथ देत आहे. कारण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे दोघेही MBBS आहेत.
   चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संकट नियंत्रणाची जबाबदारी असलेले दोन अधिकारी स्वतः डॉक्टर आहेत. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे डॉक्टर आहेत. या दोघांच्या नियोजनाने चंद्रपूर जिल्ह्यात आजवर एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. या रोगाची लागण होऊ शकणाऱ्या सर्व बाबींची नियोजनपूर्वक आखणी करून या अधिकाऱ्यांनी चंद्रपूरकरांना मोठा दिलासा दिला आहे.