हनुमान जयंतीचे औचित्य साधत नागभीड शहरातील सर्वच बॅकांना भाजपाचे जिल्हा महामंत्री व जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचे मार्फत सॅनिटायझरचे वाटप
Bhairav Diwase. April 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
नागभीड: नागभीड शहरात अनेक राष्ट्रीयकृत व खाजगी बॅंका तसेच पतसंस्था आहेत. शहरातील व ग्रामिण भागातील अनेक ग्राहक आर्थिक व्यवहार करण्यासाठी येथे येत असतात. कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीत सर्वांनीच सोशल डिस्टेन्सिंग ची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. या स्थितीत बॅंकामध्ये येणाऱ्या ग्राहकांकडुनही हीच अपेक्षा केली जात आहे. बॅंकासारख्या सार्वजनिक ठिकाणी वाढती गर्दी पाहता सद्यस्थितीतील अडचण लक्षात घेत भाजपा नेते व माजी अर्थमंत्री आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने हनुमान जयंतीचे औचित्य साधत नागभीड शहरातील सर्वच बॅकांना भाजपाचे जिल्हा महामंत्री व जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचे मार्फत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना बॅंकेच्या मुख्य द्वारावरच सॅनिटायझर हातावर टाकुन नंतरच त्यांना आत घेण्यात यावे अशी सुचना यावेळी संजय गजपुरे यांनी केली. सोबतच बॅंकेच्या परिसरात होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टेन्सिंग ची अंमलबजावणी आवर्जुन करण्याचे आवाहनही केले.आज नागभीड शहरातील बॅंक ॲाफ इंडिया, महाराष्ट्र बॅंक, स्टेट बॅंक ॲाफ इंडिया , विदर्भ कोकण ग्रामिण बॅंक, चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक , स्वामी विवेकानंद पतसंस्था यांच्या शाखा व्यवस्थापकांना या सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. यासाठी नागभीड तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक अजय काबरा व मनोज कोहाट , विनोद गिरडकर यांनी सहकार्य केले.