तेलंगणात अडकलेल्या मजुरांचा स्वगावी परतण्याची धडपड, कंटेनर ने चंद्रपुर जिल्हात प्रवेश.

Bhairav Diwase
ग्रीन झोन चंद्रपुर जिल्ह्यातुन प्रवास, जिल्ह्याचा धोका वाढला. सावली पोलीसांनी तीन कंटेनर पकडले ,७१ मजूरांना क्वारंटाईन करण्यात येणार.
    Bhairav Diwase.   April 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: तेलंगणात अडकलेल्या अनेक मजुरांना आता स्वगावी जाण्याची ओढ लागली असुन मिळेल त्या पध्दतीने कोणी पायदळ तर कोणी वाहनाने प्रवास करीत आहेत असाच तेलंगणातुन तीन कंटेनर ने निघून छत्तीसगड कडे जाणा-या मजुरांना सावली पोलीसांनी पकडले असून यात ६८ मजुरासह तीन डायव्हर होते अशा ७१ लोकांना आज पहाटे गडचिरोली जिल्ह्याच्या सिमेवर पकडून सावलीत ग्रामीण रुग्णालयात तपासणी साठी आणण्यात आले आले.
     तेलंगणा मध्ये अनेक मजूर मिरची तोडण्यासाठी, तसेच ईतर कामासाठी गेले ते लाकडाऊन मुळे अडले आहे,आता महिनाभराचा कालावधी लोटला असून गावाकडे जाण्याची आस लागली मिळेल त्या पध्दतीने प्रवास करीत आहेत त्यांचा मार्ग चंद्रपुर जिल्ह्या असुन, ग्रीन झोन चंद्रपुर मध्ये येत असल्याने जिल्ह्याचा धोका वाढला आहे .. तीन कंटेनर घेऊन जाणा-यांना सावली पोलीसांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर पकडले , तेलंगणा तुन छत्तीसगड मध्ये जात होते,गडचिरोली जिल्ह्यासीमेवर पकडून सावली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून तपासणी नंतर क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
  जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची सक्त ताकद असताना ईतर जिल्ह्यातील मजूर लोक, परप्रांतीय चंद्रपुर जिल्ह्यात येऊ नये कारण जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही तरीही अशांने जिल्ह्याचा धोका वाढत आहे , नाकाबंदी वर विशेष लक्ष केले जा आहे त्यामुळे तीन कंटेनर सापडले ही कारवाई पो.नी खाडे सावली यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी. आय मस्के, प्रदीप नितवणे यांनी केली.