पोभुर्णा तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारी पिंटुभाऊ मंगळगिरीवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत घाटकुळ येथे अडकुन पडलेल्या छत्तीसगड येथील मजुरांना.
Bhairav Diwase. April 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात तसेच राज्यांत संचार बंदी लागू केली, असून उद्योग धंदे व काम धंदे बंद असल्याने अनेक दररोजची मजुरी करणाऱ्या कुटुंबातील लोकांवर संकट कोसळले आहे. पोभुर्णा तालुक्यात विविध कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय मजुरांना जिवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. या मजुरांवर काम बंद झाल्याने उपासमारीची पाळी आली होती. नेहमीच मदतीचा हात देणारे, महाराष्ट्राचे माजी अर्थ, नियोजन तथा वनमंत्री तसेच बल्लारपुर विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनाला कुणीही उपाशी राहणार नाही. यासाठी पोभुर्णा तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारी पिंटुभाऊ मंगळगिरीवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत घाटकुळ येथे अडकुन पडलेल्या छत्तीसगड येथील मजुरांना ३० किलो तांदूळ २०किलो गहु १०किलो दाळ आणि तेल असे साहित्य दिले. यावेळी पंचायत समिती सभापती अल्काताई आत्राम, पंचायत समिती सदस्य विनोद भाऊ देशमुख उपस्थित होते.