लॉकडाऊनच्या काळात सावली येथील ठाणेदार बाळासाहेब खाडे खासगी गाडीने मुंबई येथे गेले.
Bhairav Diwase. April 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: लॉकडाऊन असताना मुंबईत जाऊन परिवाराला सावली येथे आणणारे येथील ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना चंद्रपुरातील इंस्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात आले आहे . लॉकडाऊनच्या काळात सावली येथील ठाणेदार बाळासाहेब खाडे खासगी गाडीने मुंबई येथे गेले . आपल्या कुटुंबाला घेऊन ते गुरुवारी सावली येथे परत आले . मात्र याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली. त्यामुळे त्यांना चंद्रपूर येथे इंस्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले . ठाणेदार खाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मुव्हमेंट पास घेतली होती.त्यांना तपासणी करायला सांगितले आहे.तसेच त्यांना परिवारासह इंस्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ . कुणाल खेमनार यांनी सांगितले.