सावलीत 30 लिटर गावठी दारू सह चारचाकी पकडले. 18 लाख च्या मुद्देमालसह.

Bhairav Diwase
बल्लारपूर येथील 4 आरोपीवर गुन्हा दाखल.
 Bhairav Diwase.   April 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे, साखरी
सावली: गडचिरोली या मुख्य मार्गावरून जात असलेल्या चार चाकी गाडीची तपासणी केली असता. गावठी मोहाची 30 लिटर दारू सापडली असून 18 लाख रुपये मुद्देमाल सह या प्रकरणी बल्लारपूर येथील 4 आरोपींवर गुन्हा दाखल करुन, अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. दिनांक 10 एप्रिलला MH 27 AR 8005 ही गाडी गडचिरोली वरून चंद्रपुर ला जात असतांना, या गाडी मध्ये अवैध दारू असल्याची सावली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून सावली पोलीस ठाणे समोर डीबी चे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलिक मस्के यांचा मार्गदर्शनात चेकिंग नाका लावले. व त्याच वेळात एका पांढऱ्या रंगाची एक्स युव्हि गाडी ला थांबवून झळती घेतली असता,  त्यातून 30 लिटर अवैध गावठी दारू वाहतूक करीत होते त्यामुळे या प्रकरणी संदीप परमजीतसिंग चड्डा, नितीन रामप्रसाद जाटवा , जगमोहन सत्यपालसिंग चड्डा , सचिन विजयसिंग ठाकूर राहणार सर्व बल्लारपूर यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर 65(ई),83 मदाका अन्यवे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर ची कारवाई पोलीस निरीक्षक पुंडलिक मस्के यांचा नेतृत्वात चंद्रकांत कन्नाके, सुमित मेश्राम, दीपक डोंगरे, प्रफुल आडे, अविनाश बांबोडे, प्रीती अलाम यांनी केली असून पुढील तपास सावली पोलीस स्टेशन डीबी पथक करीत आहे.