IPL 2025 स्थगित; भारत-पाकिस्तान तणावादरम्यान BCCI चा मोठा निर्णय

Bhairav Diwase

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामात १६ सामने शिल्लक आयपीएलच्या चालू हंगामात एकूण ५७ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, ५८ वा सामना काल (दि.8) धर्मशाळामध्ये सुरू होता. पण पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर हा सामना मध्येच थांबवण्यात आला. 
यंदाच्या हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जाणार होते, २५ मे रोजी कोलकाता येथे अंतिम सामना खेळवला जाणार होता. पण, आता भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता BCCI ने यंदाचे आयपीएलचे सर्व उर्वरित सामने अनिश्चितकाळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी अशा प्रकारे आयपीएलचे सामने स्थिगित करण्याचा निर्णय 2021 च्या सुरूवातीला कोरोनामुळे घेण्यात आला होता. यानंतर उर्वरित सामने यूएईमध्ये घेण्यात आले होते. यावेळेसह 2025 च्या हंगामातील उर्वरित सामने भारताऐवजी युएईममध्ये खेळवले जातील असे सांगितले जाते होते. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता BCCI ने या हंगामातील आयपीएलचे सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.