चंद्रपूर:- औद्योगिक जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरीक्षेत्र हे वेकोली खाणीने व्याप्त असून येथील कोळसा विजनिर्मिती साठी उत्कृष्ट मानला जातो त्यामुळे येथील कोळश्याला जी 8,9,12 पासून चे ग्रेड आहेत त्यामुळे विद्युत निर्मिती केंद्रात या कोळश्याला मोठया प्रमाणात मागणी आहे. मात्र याच कोळश्याच्या उत्पन्नवाढीसाठी वेकोली प्रशासन मोठया अतितीव्रतेची ब्लास्टिंग करवून माती उपसा करवून उत्पन्न वाढविले जाते,या प्रमाणबाहेर उच्चप्रतिच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरे पडली असून किती तरी घरे हादऱ्याने पडण्याच्या अवस्थेत आहेत.
तसेच वेकोली खाणीचे स्वरूप मोठे करण्यासाठी माजरी शिरणा नदीपात्राचे प्रवाह बदलून अवाढव्य मातीचे ढिगारे या नदीपात्रालगत टाकल्यामुळे पावसाळ्यात माजरी, पळसगाव, नागलोन, विसलोन, पाटाळा इत्यादी गावात दरवर्षी पुरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होते,याची इतकिंचितही काळजी वेकोली प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे.दरम्यान वेकोली प्रशासनच्या रासायनिक मिश्रित पाण्याचा निचरा शिरणानदीला जुळून असणाऱ्या वर्धा नदीपात्रात केले जाते व याच नदीचे पाणी माजरी परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी, इतर वापरासाठी दिले जाते त्यामुळे परिसरात वायुप्रदूषण, जलप्रदूषण होऊन नागरिकांना दमा, कफ, टीबी, रक्तदाब,अस्थीसबंधीचे रोग होऊन येथील नागरिकांचे जीवनमान खालविले आहे. याबतीत प्रदूषण रोखण्यासाठी वेकोली मार्फत कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही उलट वेकोलीकडून मिळालेल्या विकासनिधीचे नियोजन हे परिसरात न वापरता इतरत्र केले जात असून येथे आरोग्य शिबिराचे आयोजन सुद्धा केले जात नाही.
वेकोलीच्या माती ढिगाऱ्यावर मोठमोठया काटेरी बाभळीवाढून जंगली डुकरांचा वावर मोठया प्रमाणात वाढला असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांची मोठया प्रमाणात नासाडी केली जाते तसेच वाघ, व इतर हिंसक प्राण्यांचा वावर वाढला असून परिसरातील मानवी जीवनासाठी धोका निर्माण झाला आहे. दरम्यान या वेकोलीच्या निरागस धोरणामुळे येथील नागरिकांनी रोष वेक्त केला आहे.
आधार न्युज नेटवर्क/ जितेंद्र माहुरे भद्रावती