भद्रावती:- दिनांक ९ मे २०२५रोजी सकाळी ९:३० वाजता भद्रावती तालुक्यातील मांगली रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारा एम एच-२९ वि १७१३ क्रमांकाचा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडला. सदर ट्रॅक्टरमध्ये कोणतीही वैध परवाना अथवा खनिज वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाहीत. ही कारवाई तहसिलदार श्री. राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्री. दडमल आणि ग्राम महसूल अधिकारी श्री. श्रुगारे यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.
वाहतुकीस प्रतिबंध करून अवैध वाळूचा साठा आणि उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने घेतलेली ही कार्यवाही महत्त्वाची ठरली आहे. कारवाईदरम्यान ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी भद्रावती तहसिल कार्यालयात जमा करण्यात आला आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या अवैध खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
आधार न्युज नेटवर्क/ जितेंद्र माहूरे भद्रावती