पोंभुर्णा सारख्या छोट्याश्या शहरातील श्री नरेंद्र पिपरे यांच्या सारख्या एका माध्यमवर्गीय व्यापाऱ्यांने आपल्या उत्पन्नातील 10,000/- रुपयाची मदत आज पंतप्रधान सहायता निधीसाठी.

Bhairav Diwase
महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ, वित्त नियोजन व वनमंत्री तथा पालक मंत्री चंद्रपूर मा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मदतीच्या आव्हानाला साद देत.
   Bhairav Diwase.  April 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: जगावर आलेल कोरोना संकट हे आपल्या भारत देशावर पण आले आहे. ही बाब आपल्या साठी व संपूर्ण  जगासाठी व मानव जाती साठी दुर्दैवी आहे. त्यामुळे सगळा भारत देश व त्यातील मार्केट संपूर्ण पणे बंद आहे. यामध्ये राज्याचे माजी अर्थ वित्त व नियोजन व वनमंत्री तथा पालक मंत्री चंद्रपूर मा  आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मदतीच्या आव्हानाला साद देत पोंभुर्णा सारख्या छोट्याश्या शहरातील श्री नरेंद्र पिपरे यांच्या सारख्या एका माध्यमवर्गीय  व्यापाऱ्यांने आपल्या उत्पन्नातील 10,000/-रुपयाची मदत आज पंतप्रधान सहायता निधी मध्ये देऊन आपल्या सामाजिक जीवनाशी असलेल्या  बांधिलकीच्या नात्याचं दर्शन घडवून दिलं.
त्यांचे 
भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा
 तर्फे 
मनःपूर्वक आभार व अभिनंदन
अश्याच प्रकारे आपण सर्वांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोना शी लढण्यासाठी पंतप्रधान सहायता निधी मध्ये आपली मदत द्यावी ही आपण सर्वांना विनंती व आव्हान करत आहोत.