माजी अर्थमंत्री तथा आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रक्तदान करण्याचे जनतेला आवाहन केले.
Bhairav Diwase. April 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात आय एम ए सभागृहात २ एप्रिल पासून दररोज रक्त संकलनाचे कार्य सुरू आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे आयोजन आम सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.आज 10 एप्रिल ( ९ वा दिवस) ला महापौर राखी कंचर्लावार यांच्या परिवारातील महिलांनी रक्तदान केले.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, डॉ मंगेश गुलवाडे,डॉ झेबा निसार,नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार, दत्त प्रसन्न महादानी, प्रशांत विघ्नेश्वर, आणि पूनम तिवारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या,रक्त प्रयोग शाळेत तयार होत नाही,विज्ञान प्रगत झाले पण ते रक्त तयार करू शकले नाही,मानवी शरीरच रक्ताची पूर्तता करू शकते,त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. कोरोना च्या या संकटात हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे,मनपा चे 1200 कर्मचारी नागरिकांच्या सेवेत असून आरोग्य विभाग सक्षमपणे कार्यरत आहे,अशी माहिती त्यानी दिली.
या वेळी कंचर्लावार परिवारातील राखी कंचर्लावार, पल्लवी पिपवार,चैतन्य कंचर्लावार,जयश्री वझलवार, अमृता मुस्यालवार आणि आय एम ए च्या जोत्सना इटनकर यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ मंगेश गुलवाडे यांनी तर प्रास्ताविक दत्तप्रसन्न महादाणी यांनी केले. प्रशांत विघ्नेश्वर यांनी आभार मानले.