चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
Bhairav Diwase. April 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन 23 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 15 नमुने निगेटिव आहेत. 8 नमुन्यांचा अहवाल अद्याप बाकी आहे.
जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत बाहेर देशातून व अन्य राज्यातून ,अन्य जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची संख्या 26 हजार 536 आहे. सध्या निगराणीमध्ये असणाऱ्या प्रवाशांची संख्या 6546 आहे. 14 दिवसांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 19 हजार 990 आहे. इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईनची संख्या 20 आहे. आरोग्य विभागांचा जिल्ह्यामध्ये कसून सर्वे सुरू असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.