पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा या गावातील युवकांनी त्या हरीणाला दिले जिवदान

Bhairav Diwase
अंधारी नदीवर भर उन्हात एक हरीण पाण्याच्या शोधात आला होता.
Bhairav Diwase.  April 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथे आज दिनांक 9 एप्रिल ला सांयकाळी अदांजे 4 वाजता गावालगत असलेल्या जंगलातुन  चितळ (मादी ) गावात आली. चितळाला पाहताच गावातील कुत्री चितळ्याच्या मागे लागली. याची माहीती गावातील युवक मयुर दिवसे ,महेश दिवसे ,देविदास मोरे ,कुणाल कोपावार ,रोहीत पावडे ,तेजस दिवसे यांना मिळतात यांनी चितळाला वाचविण्याकरीता धाव घेतली. चितळ स्वतःचा जिव वाचविण्याकरीता गावालगत असलेल्या अधांरी नदि मधील पाण्यात शिरली.कुत्रे सुध्दा तिच्या पाठोपाठ पाण्यात शिरले. पंरतु युवकांनी सुध्दा जिद्दीने पाण्यात शिरून त्या चितळाला कुत्र्यांच्या तावडीतुन सुखरूप सोडवीले. नंतर त्या चितळाला गांवात आणले.याची माहीती गावातील सरपंच हरिष ढवस यांना देण्यात आली.लगेच त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे वनरक्षक रामटेके यांनी ताबडतोब आष्टा येथे जावुन चितळाला ताब्यात घेतले.नंतर त्या चितळाला पोंभुर्णा येथील वनविभागाच्या नविन विश्रामगृहाच्या शेजारी जंगलात सोडण्यात आले. यावेळी  वनरक्षक शेंडे  तसेच सुनील मंकिवार ,अमित बोदलकर ऊपस्थित होते.मादी चितळ हि गरोदर होती. चितळाला जिवनदान दिल्याबद्दल आष्टा येथील युवकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.