वैनगंगा नदीत तिघे मेडिकल शिकावू डॉक्टर बुडाले! #gadchiroli
शनिवार, मे १०, २०२५
गडचिरोली:- गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळीसाठी गेलेल्या MBBS शिकणाऱ्या तिघा युवकांचा नदीच्या पात्रात बुडून अपघात झाल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून सध्या घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली मेडिकल कॉलेजचे जिल्हा रुग्णालयात शिकावू डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले आठ युवक आज सुट्टीचा दिवस असल्याने वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र, यामध्ये गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे हे तिघे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अचानक खोल पात्रात बुडाले.