एसडीओ पुजारा सर, सभापती अल्का आञाम, तहसिलदार खटके सर, ठाणेदार नाईकवाड सर, विनोद देशमुख, गंगाधर मडावी, बिडीओ साळवे सर, अधिकारी आणि पदाधिकारी यांनी केले रक्तदान.
Bhairav Diwase. April 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.आज पंचायत समिती पोंभुर्णा येथे सरकारने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत. पंचायत समिती पोंभुर्णा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. पंचायत समिती पोभुर्णा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्यावेळी एसडीओ पुजारा सर, सभापती अल्का आञाम, तहसिलदार खटके सर, ठाणेदार नाईकवाड सर, विनोद देशमुख, गंगाधर मडावी, बिडीओ साळवे सर, अधिकारी आणि पदाधिकारी यांनी सुद्धा रक्तदान केले. या रक्तदान प्रक्रियेमध्ये सर्व अधिकारी आणि पदाधिकारी सहकार्य केले. व सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांना सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.