व्याहड बूज येथील रवींद्र निकेसर हे व्यापारी असून त्यांचा वर कारवाई करण्यात आली.
Bhairav Diwase. April 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)मोनिका दि भुरसे साखरी, सावली
सावली: कोरोना मुळे रोजगार नाही त्यामुळे केंद्र व राज्य सरकार गरिबांना प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत देत आहे.तसेच स्वस्त धान्य दुकानात गहू व तांदूळ,डाळ चे वाटप सुरू आहे . मात्र याचा फायदा हे व्यापारी घेत असून गरीब ग्राहकाकडून खरेदी केलेला गहू व तांदूळ चा अवैध वाहतूक होत आहे . आज दिनांक 9 एप्रिल ला दुपारी 2 च्या सुमारास सावली कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव नरेश सुरमवार यांनी तालुक्यात असलेल्या गस्ती दरम्यान व्याहड बूज येथे गाडी क्रमांक MH 33 T 1924 ची चौकशी केली असता. त्यात हा अवैध साठा असलेली गाडी पकडली. सदर गाडी ही उपबाजार समिती व्याहाडखुर्द येथे आणन्यात आली . त्यानंतर बाजार समिती सचिव नरेश सुरमवार व सभापती हिवराज शेरकी यांनी तहसीलदार पुष्पलता कुमरे यांना माहिती दिली त्यावरून सावली तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षन अधिकारी कु . विभावरी अबगळ , राजेंद्र शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला त्यात गहू 29.50 क्विंटल , तांदूळ 7 क्विंटल , तुवर 4 क्विंटल ,काळी पोपट 9 क्विंटल , उलीद 50 किलो मिळाले. हे सर्व अवैध खरेदी चे असल्याचे यावेळी निर्दशनास आले व हे वाहन गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील एका मोठया व्यापारी कडे नेत असल्याची माहिती दिली आहे. सदर खरेदी करणारे हे व्याहड बूज येथील रवींद्र निकेसर हे व्यापारी असून त्यांचा वर कारवाई करण्यात आलेली आहे व गाडी व माल जप्त करण्यात येऊन पोलीस कारवाई करण्यात येणार आहे . सदर तालुक्यात गहू चा पेरा नसतांना ही अवैध रीत्या गहू खरेदी करून ते पाठविण्याचा गोरख धंदा सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक व्यापारी हे बिना परवाने असतांना खरेदी करीत असल्याचे या निमित्याने उघडकीस येत आहे.