चेकपिरंजी जि. प. क्षेत्राच्या सदस्या सौ. मनीषाताई चिमुरकर यांना स्थानिक पातळीवर वाटप करण्यासाठी सॅनिटयझरचे वितरण.
Bhairav Diwase. April 29, 2020
सावली: कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी लागू केली गेली आहे. अशा परिस्थितीत खबरदारी परतण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना सॅनिटायझरचा उपयोग करावा. आणि त्यामाध्यमातुन सर्वांना आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून, जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सावली तालुक्यातील चेकपिरंजी जि. प. क्षेत्राच्या सदस्या सौ. मनीषाताई चिमुरकर यांना स्थानिक पातळीवर वाटप करण्यासाठी सॅनिटयझरचे वितरण केले.