🔴शाळा खोलून देण्यास ग्रामपंचायतीचा नकार.
🔴ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणाची सर्वत्र चर्चा.
Bhairav Diwase. May 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- पोटाची थडगी भरण्याकरिता वणवण भटकणारा जीव, संकटात सापडलाय. ग्रामीण भागात कामाची कमतरता असल्याने कामाच्या शोधात औरंगाबाद येथे गेलेल्या एका परिवाराची व्यथा, औरंगाबाद मध्ये कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता, लागलेली गावाची ओढ, राहावंली नाही, अखेर तारसा या स्वगावी काल दिनांक 13 रोजी तो परत आला. परत आल्यावर त्याला झालेलं दुःख तो आयुष्यात कधीच न विसरणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोरोना ने अख्या जगात कहर केला आहे. हजार किलोमीटरवरुन आलेल्या पोटच्या गोळ्याला आईने घरात घेण्याकरिता नाकारलं, गावकार्याणीसुद्धा त्याचा तिरस्कार केला, पिण्यासाठी कुणी पाणीही देत नव्हते, स्व:ता आपल्या परिवारासह विलगिकरंनात राहायला तयार असताना त्याला शाळा देण्यासाठी नाकारलं, आपल्या छोट्याश्या मुलीला घेऊन तब्बल तीन तास लखलखत्या भर उन्हात त्याला ताटकळत उभ राहावं लागलं, भुकेने व्याकुळ, तहानेने त्रासून जाऊन अखेर त्याने दोन भिंतीच्या मदात आपलीच चादर ओढली, छोटी खोपडी बनविली आणि तात्पुरता विसावा घेतला. असे भयाण विदारक चित्र त्याच्या नशिबी आल. तब्बल तीन तासानंतर गोंडपीपरी ठाणेदाराच्या माध्यस्तीने त्याला राहण्यासाठी शाळा मिळाली. अशी दुर्दैवी वेळ कुणावर येऊ नये, यावेळी असच म्हणावं लागेल. निर्दयतेचा कळस गाठलेली ग्रामपंचायत तारसा बूज. आणि तेथील प्रशासन यांचे मोठ्या दिलाने सर्वत्र कौतुकच केल्या जात आहे. अखेर आईची माया ही वेगळीच काही वेळानी आईनेच जेवणाचा डबा बनवून आणून दिला, आणि त्यांच्या पोटाला आधार मिळाला. आई ही आईच असते. यावरून वामनदादांच्या दोन ओळीची आठवण झाली
आई,आई असते,। लंगळ्यांचा पाय असते ।
वासराची गाय असते ।
दुधावरची साय असते । आई ही आईच असते.
आई माझी मायेचा सागर
दिला तिने जिवना आधार