जाणून घेतल्या मजुरांच्या समस्या.
Bhairav Diwase. May 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील साखरी गावामध्ये बाहेर राज्यातून आलेल्या ८४ मजुरांना शाळेमध्ये विलगिकरण करून ठेवण्यात आले आहे.या मजुरांना भेटून व त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी भेट दिली.तालुक्यात १ में पासून अनेक मजूर बाहेरून आले होते व त्यांना प्रत्येक गावातील शाळा,महाविद्यालय व सभागृह इत्यादी ठिकाणी विलगिकरण करून ठेवण्यात आले.या सर्व विलगिकरण केलेल्या मजुरांची व्यवस्था व आरोग्यविषयक तपासणी गावातील समिती,ग्राम सुरक्षा दल व वैद्यकीय कर्मचारी करीत आहेत.सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी तालुक्यातील अनेक मजुरांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन या आजाराबद्दल माहिती सांगितली. 'आपण घाबरून न जाता सावध राहून आपली काळजी घेणे गरजेचे आहे व चौदा दिवस इथेच राहून नियमांचे पालन करा आणि प्रशासनाला सहकार्य करा. आरोग्याबाबतीत काही समस्या जाणविल्यास आरोग्य कर्मचारी यांना कळवा, असे सभापती विजयभाऊ कोरेवार यांनी सांगितले.त्यावेळी गावातील सरपंच ऊषाताई वनकर, माजी सभापती राकेश गड्डमवार, आंगनवाडी सेविका निलिमा भुरसे, ताराबाई भुरसे,आरोग्य सेविका आत्राम सिस्टर,आशावर्कर रत्नामाला चौधरी, ग्रा प शिपाई दिगांबर मुळेवार, शा व्य स अध्यक्ष महादेव मडावी, सामाजिक कार्यकर्ते देवाजी बावणे उपस्थित होते.