Click Here...👇👇👇

तळीरामांची हौस भागविण्यासाठी दारूची बंद पाऊचमध्ये विक्री.

Bhairav Diwase
दारू विक्रेत्यांची नवी शक्कल, अनेकांना घरपोच सुविधेचा लाभ.
Bhairav Diwase.   May 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- कोरोना या वैश्विक महामारी मुळे घोषित करण्यात आलेल्या टाळेबंदी ला आज दीड महिन्याचा कालावधी लोटला असून सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. अशातच तळीरामांना मध्ये वाढती दारूची मागणी पूर्ण करण्यासाठी हातभट्टी दारू व्यवसायिकांनी मोह फुल तथा गुळाची दारू प्लास्टिक बंद पाऊच मध्ये भरून विक्री करण्याची नवी शक्कल लढविली असून अनेकांना या सुविधेचा घरपोच लाभ मिळत असल्याचे दिसून येते.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन पाच वर्षाचा काळ लोटला मात्र जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा अगदी जवळ लागून असल्याने सदर तालुक्यात मुबलक प्रमाणात सहज रित्या दारू उपलब्ध होते. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून गोंडपिपरी शहरासह तालुक्याच्या विविध गाव खेड्यापाड्यांमध्ये दारू विक्रेत्यांची संख्या वाढली होती. मात्र कोरोना या वैयक्तिक महामार्गामुळे देशात टाळेबंदी ची घोषणा करण्यात आली अशातच या टाळेबंदी ला आज दीड महिन्याचा कालावधी लोटला असून तळीरामांची घसे कोरडे पडले होते. यामुळे तालुक्यातील तळीरामांनी हात भट्टीचा आधार घेत मद्य तृष्णा भागविण्यासाठी गावोगावी खेडोपाडी शोध मोहीम सुरू केली. ग्रामीण भागामध्ये प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या मोह फूल व गुळापासून दारू निर्मितीची कला अवगत असून  टाळेबंदी काळात रिकामटेकडे पणामुळे अनेक अवैध दारू व्यवसायिकांनी व  मोहफुल व गुळ तसेच तुरटी मिश्रित हात भट्टी तून दारू काढून विकण्याचा सपाटा सुरू केला. अशातच शहरी भागांमध्ये भरपूर प्रमाणात दारूची मागणी वाढल्याचे पाहून तळीरा मान पर्यंत दारू पोहोचविण्यासाठी  पोलिसांना चपराक देत आगळी वेगळी शक्कल लढवत आता प्लास्टिक च्या पाऊच मध्ये दारू ओतून सील बंद पाऊच मधून दारूविक्री चा नवा फंड अमलात आणल्याचे निदर्शनास येते. तालुक्यातील सध्या ग्रामीण भागातील करंजी ,बेरडी ,गणपुर ,कन्हाळगाव , पारगाव ,उंदिरगाव आधी गावांकडे तळी रामांनी प्रहरी पासून ते रात्र पर्यंत वाट धरली असून तृष्णा भागविण्यासाठी धडपड चालवल्याचे माहिती सुत्रांकडून कळते. अशातच नजीकच्या तेलंगाना राज्यात कालपासून शासनाने दारू दुकाने उघडण्याची मुभा दिल्याने तेलंगाना ते भंगाराम तळोधी मार्गे गोंडपिपरी व इतर खेडोपाडी काल रात्री दारू साठा पोचता झाला असून आता तळीरामांची शोध मोहीम आटोक्यात आल्याची ही माहिती आहे. तर पाऊच बंद दारू पॅकेटमध्ये पाण्याचा अधिक भरणा असल्यामुळे नाईलाजास्तव हातभट्टी दारू वर तृष्णा भागविणाऱ्या तळीरामांनी आता हातभट्टीच्या दारूला बगल देत तेलंगणातील बाटली बंद दारू चा आधार घेतल्याची माहिती आहे. दारूचा अल्प पुरवठा मात्र मागणी जास्त अशा परिस्थितीत तळीरामांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत असून दामदुपटीने दारू विकत घ्यावी लागत असल्याचे कळते. 

बॉक्स :- जे बोरकुटेंना जमले ते धोबेंना का नाही ...?
जिल्ह्यात दारूबंदी नंतरच्या काळात लगतच्या तेलंगणा राज्यातून गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा पुरवठा केल्या जात होता. अशातच ठाणेदार पदाची सूत्रे हाती घेऊन तत्कालीन ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी  धडक मोहिमेतून अवैद्य दारू विक्रेत्यांना सळो कि पळो करून सोडले. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटलाच बोरकुटे यांची नागपूर ग्रामीण येथे बदली झाली. त्यानंतर रुजू झालेले प्रभारी ठाणेदार संदीप धोबे यांना अवैद्य दारू विक्रीवर लगाम लावण्यात सपेशल अपयश आले असून जे प्रवीण बोरकुटे यांना जमले ते संदीप धोबे यांना का नाही जमले ? असा सवाल महिलावर्ग तथा नागरिकांकडून विचारला जात आहे.