मा.माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या नेतृत्वाखाली ता.महामंत्री सतिश बोम्मावार, सावली शहर अध्यक्ष नगरसेवक चंद्रकांत संतोषवार, ब्रम्हपुरी शहर महामंत्री व माजी नगरसेवक मनोजभाऊ भूपाल यांनी मजुरांना स्वगावी पाठवताना सहकार्य.
Bhairav Diwase. May 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- कोरोना विषाणू वैश्विक महामारी मुळे संपूर्ण देश लॉक डाऊन झाले आहेत व यामुळे प्रत्येक राज्यात,जिल्ह्यात मजदुर बांधव अडकले. आहेत. तालुक्यातील उपरी येथे घोसेखुर्द पाईप लाइन च्या कामा करीता आलेले १३ मजूर अडकून असलेले मजुर बांधव त्यांनी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मा.माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या कडे धाव घेतली. त्यांनी सावली चे तहसीलदार कुंमरे मॅडम व नायब तहसीलदार कामळी साहेब यांना सूचना करून त्यांना आज खाजगी गाडी करून मजुरांना सकाळचं जेवण झाल्यावर त्यांना सोबत जाताना नाश्ता, पाण्याचे बॉक्स, मास्क, सॅनिटीझर देण्यात आले. सावली तहसील कार्यालयातुन आज १२ वाजता गाडी रवाना झाली. त्यांना नागपूर रेल्वे स्टेशन पर्यंत सोडण्यात आले.तिथून शासना तर्फे झारखंड परंत रेल्वे ची सोय करण्यात आली आहे.
मा.माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या नेतृत्वाखाली ता.महामंत्री सतिश बोम्मावार, सावली शहर अध्यक्ष नगरसेवक चंद्रकांत संतोषवार, ब्रम्हपुरी शहर महामंत्री व माजी नगरसेवक मनोजभाऊ भूपाल यांनी पाठवताना सहकार्य केले.