Click Here...👇👇👇

मा.खासदार अशोकजी नेते यांनी सावली तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती बद्द्ल शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक.

Bhairav Diwase
खासदार नेते साहेबांनी तहसीलदार व आरोग्य विभागाकडून कोरोना प्रादुर्भाव बद्दल काय उपाययोजना केल्या जात आहे याबद्दल माहिती जाणून घेतली.
Bhairav Diwase.   May 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- बैठकीमध्ये खासदार नेते साहेबांनी तहसीलदार व आरोग्य विभागाकडून कोरोना प्रादुर्भाव बद्दल काय उपाययोजना केल्या जात आहे याबद्दल माहिती जाणून घेतली.कोरोनटाईन केलेल्या व्यक्तींना जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, याबद्दल खासदारांनी विचारपूस केली. सदर बैठकीमध्ये बांधकाम, कृषी, वन, सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध विकास कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची सुचना केली.सदर बैठकीत कृषीविषयक शेतकऱ्यांना बी बियाणे व रासायनिक खते, उपलब्ध करून देण्याचा सूचना देण्यात आल्या.
सदर बैठकीला सावली तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक चंद्रकांत संतोषवार, भाजपा जिल्हा सचिव देवराव सावकार मुद्दमवार, भाजपा जेष्ठ नेते प्रकाश पाटील गड्डमवार, व मा.तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, ठाणेदार,  नगरपंचायत मुख्याधिकारी, व विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते