Top News

युवकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणारे युवा नेता म्हणजेच राकेश भाऊ पुन यांचा आज वाढदिवस.

सामाजिक दायित्व स्विकारणारे युवा नेतृत्व असलेला नेता म्हणजेच राकेश भाऊ पुन.
    Bhairav Diwase.   May 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी:- राकेश भाऊ पुन व्हाट्सअप क्र:- 90220 33898

गोंडपिपरी:-  सामाजिक व राजकीय चळवळ ही निरंतर चालणारी एक समाजशील आणि संवेदनशील अशी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत स्वाभाविकच काही संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारी व्यक्ती मिळतात. अशाच एका अविकसित असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील तसेच शहरातील युवकांचे विकासाच्या पडद्याआड जीवन जगणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाचे ऋण फेडण्यासाठी राजकीय व सामाजिक चळवळीची धगधगती मशाल हाती घेणारा युवा नेता गोंडपिपरी नगरपंचायतीचे नगरसेवक राकेश भाऊ पुन यांनी अल्पशा काळात राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपली पकड मजबूत करून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा युवा नेता म्हणून आपली ओळख निर्माण करून युवकांचे प्रेरणास्थान ठरत आहे.

जीवनावर आधारित वाढदिवसा व्हिडिओ:- https://youtu.be/2KjswqGHjao

        शहरातील प्रतिष्ठित व्यापारी निलेश संगमवार या नेत्यांचे भाचे असलेले नगरसेवक राकेश पुन यांनी आपले मामा निलेशजींना त्यांच्या व्यवसायात हातभार लावून सोबतच आपले शिक्षण पूर्ण केले. कालेज वयात शिक्षणाबरोबरच सोबत शिकणाऱ्या युवक युवतींच्या समस्या सोडवण्याचा ध्यास त्यांनी अंगीकारून बाहेर गावहुन तालुकास्तरावर शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या राकेश भाऊ पुन यांनी जाणून घेत वृत्तपत्रे, निवेदने, तथा पर्यायी आंदोलने उभारून समस्या दूर करण्यात त्यांनी अनेकदा यश मिळविले. 
           शहरात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात त्यांचा यशस्वी सहभाग राहिला. अशातच गोंडपिपरी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होऊन निवडणूक लागली यात त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधून निवडणूक लढवून बाजी मारत नगरसेवक पदाची माळ गळ्यात पाडली. यानंतर त्यांनी इतर नगरसेवकांच्या तुलनेत राजकीय कर्तबगारीने शहर नगरपंचायतीचा पहिला बांधकाम सभापती पद मिळवून त्या पदाचा योग्य कार्यही चालविले.
           
             शहरातील रस्ते, नाल्या, सफाई यासाठी वारंवार धडपड चालविली. तर जिल्हा पालकमंत्री यांनी शहरातील अंतर्गत रस्ते बनविण्यासाठी दिलेल्या दहा कोटी रुपयांचा प्रचंड निधी मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यासोबतच प्रभाग ४ मध्ये सलग स्वच्छता, पाणीपुरवठा सुरळीत करणे, हातपंप दुरुस्ती, पथदिवे समस्या आदी सुविधा सुयोग्य पुरवून प्रभाग क्रमांक ४ ला हागनदारीतून मुक्त केले. 
             
       सोबत शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण, चिनी वस्तू खरेदी बाबत जनजागृती, युवकांना नव्या प्रेरणा देण्याहेतू थोर महात्मे यांच्या प्रतिमांचे वितरण, शहरात रक्तदान शिबिरे, कर्तबगार युवकांना भेडसावणार्‍या युवकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदतीचा हात देऊन, त्यांचा मार्ग सुकर करणे, शासकीय योजनांपैकी, आधार कार्ड शिबिर, जात प्रमाणपत्र शिबिर, राशन कार्ड शिबिर, तसेच अन्य दाखल्यांचे शिबिर घेऊन जनसामान्यांची पायपीट ही थांबवली. 
        तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना शहरस्तरावर उपचार घेताना अकस्मात पडणारी रक्ताची गरज व ग्रामीण रुग्णांना ते बायकांची होणारी लूट दूर करण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया वरून मित्र मंडळांकडून विविध रक्तगट असलेल्या रक्तदात्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली आहे. प्रत्येक दिन विशेष यांची आवर्जून आठवण करून देत या संकल्पना स्पष्ट करणारे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती राकेश पुन यांनी अल्पावधीतच राजकीय, सामाजिक, धार्मिक चळवळीत यशस्वी सहभाग घेऊन, आपली छाप सोडत युवकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने