१ गाय, १ वासरू मनोहर बल्की यांच्या मालकीची आणि 1 गाय विक्की देवगडे यांच्या मालकीची.
Bhairav Diwase. May 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णापोंभुर्णा:- पोंभुर्णा शहरात आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्या, विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथे वीज पडून गाईंचा मृत्यू झाला.
ही घटना आज सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली. पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूरातील गाई चरासाठी नदीकडे गेले असता. वादळी वाऱ्या, विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यांनंतर गाई घराकडे परत येत असताना, ३ गाईंच्या अंगावर वीज पडून गाईंचा मृत्यू झाला. 2 गाय आणि 1 वासरु यांचा त्यामध्ये समावेश होता.
न्यूज व्हिडिओ येथे क्लिक करा👇
👇👇👇👇👇https://youtu.be/p_7doggqTog
२ गाय आणि १ वासरू मनोहर बल्की स्वतःच्या मालकीची होती. तर 1 गाय विक्की देवगडे यांच्या मालकीची होती. चेक बल्लारपूर येथील ग्रामपंचायत सरपंच दशरथ फरकडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.