∆ जिल्ह्यात एकही कोरोना पाझिटिव्ह रुग्ण नाही.
∆ तरीही ऑरेंज कलर झोनमध्ये जिल्ह्याचा समावेश.
∆ पालकमंत्र्यांच्या कामगिरीवर नागरिकांचा सवाल.
Bhairav Diwase. May 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर: देशात थैमान घातलेल्या कोरोना आजाराच्या लढ्यात कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मागील महिनाभरापासून देशभर संचारबदी कायदा लागू करुन लॉकडाऊन पाळण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्हातील नागरिक सुद्धा मोठ्या हिम्मतीने शासन प्रशासना कडून वेळोवेळी मिळणाऱ्या सुचना व आदेश पाळत प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही कोरोना आजाराने शिरकाव केलेला नाही. याची अधिकृत माहिती वारंवार जिल्हा माहिती विभागाच्या वतीने जनमानसात पोहचवल्या जात आहे. परंतु केंद्र सरकार कडून संपूर्ण जिल्ह्यांची कोरोना पाझिटिव्ह रुग्णांची माहिती घेऊन त्या त्या जिल्ह्यांना कलर झोन ठरवून वेगवेगळे निर्देश देण्यात आले. त्यात चंद्रपुर जिल्ह्याचे स्थान हे ऑरेंज झोन मध्ये टाकण्यात आले. परंतु या चंद्रपुर जिल्ह्यात प्रशासनाच्या सांगण्यावरुन एकही कोरोना पाझिटिव्ह रुग्ण नसतांना कसे काय ? ऑरेंज झोन मध्ये या जिल्हाचा समावेश करण्यात आला ?. असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.
अश्या कलर झोन चा प्रकार शासनाकडून ठरवण्यात आला की, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अश्या जिल्ह्यांना हॉटस्पॉट ठरवून रेड कलर झोन ठरवण्यात आले. व जिल्ह्यात कडेकोट लॉकडाऊन करण्यात आला. दुसरे म्हणजे ज्या जिल्ह्यात कमीत कमी संख्येत कोरोना पाझिटिव्ह रुग्ण आहेत त्या जिल्ह्यांना ऑरेंज कलर झोन ठरवण्यात आले. व संचारबदीचा कायदा काही प्रमाणात शिथिल करण्यात आला. तर तिसरे म्हणजे ज्या जिल्ह्यात एकही कोरोना पाझिटिव्ह रुग्ण नाही त्या जिल्ह्यांना ग्रीन कलर झोन ठरवण्यात आले. आणी संचारबदी व लॉकडाऊन ला मोठ्या प्रमाणात शिथिल करीत जिल्हा अंतर्गत नागरिकांना काही सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तिन मे च्या नंतरच्या लॉकडाऊन ला काही प्रमाणात सुट दिली जाणार होती.
मात्र महाआघाडी सरकार मधील कांग्रेस पक्षाचा कदावर नेता म्हणून ओळखला जाणारा नेता चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पाझिटिव्ह रुग्ण संख्या एक सुद्धा नसतांना चंद्रपूर जिल्ह्याला ग्रीन कलर झोनमध्ये ठेवण्यात असमर्थ ठरला जात आहे. यावरून त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना लढ्यात उत्तम कार्य करणारा ‘पालकमंत्री’ म्हणून वाजलेली घंटा आता कार्यशुन्य ठरते आहे. कोरोना आजाराच्या लढ्यात जिल्ह्यातील गरजूंना पालकमंत्र्यांच्या माध्यमातून वाटलेल्या ४० हजार अन्नधान्य किट्स वाटपाचा लेखा-जोखा खासदारांनी विचारताच मोठा गोंधळ उडाला होता. कदाचित जिल्ह्याचे पालकमंत्री या गोंधळात गोंधळून तर गेले नसणार? यात चंद्रपूर जिल्ह्याला ग्रीन कलर झोन मध्ये ठेवण्याचा विसर तर पडला नसणार ?असे अनेक संभ्रमित सवाल चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक पालकमंत्र्यांच्या कर्तव्यावर करीत आहेत.