Click Here...👇👇👇

सौ. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी आंबेधानोरा आणि डोंगरहळदी गावात आलेल्या मजुरांना मास्क, बिस्किटच वाटप.

Bhairav Diwase
🔵बाहेर राज्यातुन आलेल्या क्वारंटाईन असलेल्या मजुरांना भेट.
Bhairav Diwase. May 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा:- भारत देशात नाही तर जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना, संस्था, व्यक्ती या लढाईत आप-आपला योगदान देत आहे. काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा १ रुग्ण आढळून आले. तर काही दिवसा पहिले चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा १ रुग्ण आढळला होता. आता त्या रुग्णाची प्रकृती ठीक आहे. चंद्रपुरात कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, 23 वर्षाच्या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला आहे. ही मुलगी 9 मे रोजी यवतमाळ येथून चंद्रपूर ला आली होती. चंद्रपुर जिल्हाधिकाऱ्यांनी अशी माहिती. त्यामुळे चंद्रपुर जिल्हा प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधानोरा आणि डोंगरहळदी येथील व्यक्ती आंध्रप्रदेश मध्ये मिरची तोडण्यासाठी गेले होते. पण लाॅकडाउन मुळे ते तिथेच अडकून पडले होते. सरकारने बाहेर राज्यात गेलेल्या मजुरांना स्वगावी आणण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर आंबेधानोरा आणि डोंगरहळदी गावातील मजूरांना स्वगावी आणले. कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधानोरा आणि डोंगरहळदी गावातील ग्रामपंचायत यांनी मजुरांना गावातील शाळेमध्ये सोय केली आहे. ज्योतीताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा  यांनी आंबेधानोरा आणि डोंगरहळदी गावात आलेल्या मजुरांना भेट दिली. यांच्या कडून बाहेर राज्यातुन आलेल्या क्वारंटाईन असलेल्या मजुरांना भेटून मास्क आणि बिस्किटच वाटप करण्यात आले.