साखरी रेती घाटावर कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक.
Bhairav Diwase. May 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील वैनगंगा घाटावर अनेक दिवसापासून रेती तस्करी चालू असल्याचे चित्र दिसत आहे.साखरी घाटावरून रेती तस्करी करीत असणाऱ्या दोन ट्रॅक्टर पकडून सावली पोलिसांनी कारवाई केली आहे.
रेती तस्करा कडून पत्रकारांवर हल्ले होत होते. याबाबत रेती तस्करांवर कारवाई करिता पत्रकार संघटनेकडून निवेदने देण्यात आले. व नागरिकांकडून सुद्धा रेती तस्कर यांची अरेरावी पणा वाढल्यामुळे तक्रारींचा ओघ वाढला. यावर महसूल प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे ओरड बघता रेती तस्करांवर कारवाई करण्याकरिता पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनावर मात करीत, काल दिनांक १२/५/२०२०ला रात्री ९च्या दरम्यान राजेश वसंत राईचवार राहणार सावली यांच्या दोन ट्रॅक्टर साखरी रेती घाटावर कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत असून महसूल प्रशासन प्रति नाराजीचे सूर उमटत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की सावली तालुक्यात सर्वत्र रेती तस्करी जोमात असल्याने या रेती तस्करी ची माहिती महसूल प्रशासनाला दिल्यास महसूल प्रशासन वेळकाढू धोरण अवलंबून आम्हाला सध्या कोरोनाचेच काम असल्यामुळे व स्टाफ कमी असल्यामुळे आम्ही कुठे कुठे जाऊ व कुणाकुणावर कारवाई करू असे ऊर्वाच्च बोलून रेती तस्करांची पाठराखण करीत असल्याचे चर्चा सर्वत्र होते आहे .व पोलिस प्रशासनाने महसूल प्रशासनावर मात करून रेती तस्करांवर कारवाई केल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कर्तव्य प्रणाली पोटी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की सावली तालुक्यातील साखरी घाट कोट्यवधीचा महसूल शासनाला मिळवून देणारा घाट म्हणून साखरी घाटाकडे पाहिल्या जाते व साखरी घाटातील रेती ही उच्च दर्जाची असल्यामुळे या रेतीवर रेती तस्कर यांचा डोळा असून या घाटावरून अनेक रेती तस्करांनी लक्षावधी रूपयाची रेती लंपास केली या रेती तस्करी बाबत पोलीस प्रशासनाला सुद्धा गोपनीय माहिती मिळत असत अशातच साखरी रेती घाटामध्ये रेती तस्करी चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे सावली पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनात पोलिस कर्मचाऱ्यांनी रात्री ९च्या दरम्यान सावली येथील राजेश वसंतराव राईचवार यांचे दोन ट्रॅक्टर रेती भरलेले असल्याचे आढळून आल्याने व त्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारचा रेती वाहतूक परवाना नसल्यामुळे दोन्ही ट्रॅक्टर सावली पोलीस स्टेशनला आणून चौकशीत घेतले व सदर घटनेची माहिती तहसीलदार सावली यांना देण्यात आली मात्र वृत्त लिहीपर्यंत तहसीलदारांनी रेतीचे तस्करावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे कळते यापूर्वीसुद्धा राजेश वसंत राईचवार यांच्या ट्रॅक्टर वर कारवाई झालेले असून एक लक्ष रुपयापेक्षा जास्त रुपयाची दंडात्मक कारवाई झालेली असताना सुद्धा लक्षावधी रुपयाच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता सदरहू इसमाने रेती तस्करी जोमात सुरू ठेवल्यामुळे या रेती तस्कर ला अभय कुणाचे असा प्रश्न सर्वांच्या मनी उपस्थित होत आहे.
व सदर रेती तस्कराचे महसूल प्रशासनाची अर्थपूर्ण संबंध तर नाही ना असा खडा सवाल सुद्धा उपस्थित होत आहे व पोलिस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे महसूल प्रशासनाच्या कर्तव्य प्रणाली पोटी नाराजीचे सूर उमटत आहे. तेव्हा उपविभागीय अधिकारी यांनी वारंवार रेती तस्करांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना लिहून दिलेल्या बंध पत्रात लिहून घेतलेल्या अटी व शर्तीचा भंग होत असल्यामुळे रेती तस्करांवर गुन्हे नोंद करून रेती तस्करीला आळा घालून शासनाची कोट्यावधी रुपयाची होणारी लय लूट थांबवावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.