Top News

सावली तालुक्यातील पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये एम बी बी एस डॉक्टर च्या मागणीकडे दुर्लक्ष.

आहेत का कुणी वाली?  पाथरी येथील जनतेचा सवाल
    Bhairav Diwase.   May 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी नगर परिसरातील मुख्य ठिकाण असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्र तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक जयकिसान बँक तसेच मंडळ अधिकारी कार्यालय अशे बरेच कार्यालय असून या परिसरातील जनता दैनंदिन कामासाठी रोज ये -जा करतात. या ठिकाणी जिल्हा परिषद चे शासनाचे आरोग्य वर्धिनी केंद्र आहे. या आरोग्य वर्धिनी केंद्रात परिसरातील जनता आरोग्याच्या सुविधेसाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात येतात परंतु या ठिकाणी  कर्मचारी अभाव तसेच एम बी बी एस डॉक्टर  नसल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी सातत्याने केली गेली परंतु या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केल्या गेले. या ठिकाणी दोन बी. ए. एम. एस डॉक्टर असून आरोग्याच्या उत्तम सुविधा नागरिकांना मिळण्याकरिता जनतेच्या सेवेसाठी व पाथरी तथा परिसराच्या विकासासाठी नेहमी काम करणारी पाथरी तालुका संघर्ष समिती एक एम. बी बी एस. डॉक्टर ची मागणी सातत्याने करीत आहे. परंतु या मागणीकडे कुणाचेही लक्ष का जात नाही ही विचार करण्यासारखी बाब आहे. या परिसराचा द्वेष तर नाही ना?  असा सवाल ही उपस्थित होत आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण असून कर्मचारी अभाव या मुळे पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातून प्रसूती रुग्ण किव्हा इतर रुग्ण नेहमी जिल्हा आरोग्य रुग्णालय येथे पाठविल्या जात आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात गरीब वर्गाच्या हाताला काम नाही. काम नाही तर हातात पैसा नाही, सध्याच्या परिस्थिती च्या काळात मध्यमवर्गीय तथा गरीब जनता पोट भरण्यास सक्षम नसून जर घरात एखादा व्यक्ती बिमार झाला तर मोठ्या अडचणीचा सामना या वर्गाला करावा लागत आहे. या आरोग्य वर्धिनी केंद्रात एकच रुग्णवाहिका असून जर एकाच वेळेस प्रसूती रुग्ण आणि इतर रुग्ण आल्यास  जिल्हा रुग्णालयात पाठविण्यास प्रसूती रुग्णाला प्रथम प्राधान्य दिल्या जाते. हे ही बरोबरच आहे. परंतु इतर बिमार  असलेला गरीब रुग्ण त्याच काय? ज्याच्याकडे किरायाने गाडी करून नेण्याची क्षमता  नाही. हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. या आरोग्य वर्धिनी केंद्रात रिक्त असलेल्या जागा जर भरती केल्या आणि या ठिकाणी एक एम. बी बी एस डाक्टर ची मागणी जर पूर्ण केली तर साधारण रुग्णाचा  याच ठिकाणी उपचार होऊन गरीब वर्गाला होणारा त्रास कमी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पाथरी येथील पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती वारंवार रिक्त जागा भरण्याची तसेच एम. बी. बी. एस डॉक्टर ची मागणी करीत आहे. जे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सुलभ होणार आहे. परंतु या मागणीला केराची टोपली दाखविल्या जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने