गोंडपिपरी तालुक्यात एलसीबी (LCB) पथकाच्या कारवाईत दोन लाखांची दारू जप्त.

Bhairav Diwase
गोंडपिपरी पोलिसांवर प्रश्नचिन्ह?
    Bhairav Diwase.   May 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- लॉकडाऊन च्या काळात सर्वत्र बंद असताना काही दारू तस्करांनी शेजारच्या तेलंगाना राज्यातून दारू तस्करी चे काम जोमात सुरू केले असून यावर पाळत ठेवत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूर पथकाने तालुक्यातील नंदवर्धन - अडेगाव मार्गावर सापळा रचून दोन लाख किमतीची अवैद्य दारू व व दुचाकी वाहन असा 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई काल रात्री 1 वाजताच्या दरम्यान करण्यात आली. पोलिसांना पाहताच मुद्देमाल सोडून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

संपूर्ण विश्वात कोरोना या महामारी ची लाट पसरली असून सर्वांना हैराण करून सोडले आहे. अशातच गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा सीमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैद्य रित्या दारू तस्करी करणे सुरू केले आहे. दारू तस्करांच्या या हालचालींवर पाळत ठेवत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूर ने काल रात्रीच्या सुमारास सापळा रचून तालुक्यातील नंदवर्धन- अडेगाव या मार्गावर दुचाकीने दोन इसम दारू देत असताना आढळले असता त्यांचा पाठलाग करून घडविण्याच्या प्रयत्नात असताना त्या दोन वा चालकांनी रोडवर वाहन सोडून पळ काढला. याचदरम्यान तपासणी केली असता इंग्रजी दारूच्या एकूण 636 बाटल्या आढळून आल्या. तसेच वाहनांची तपासणी केली असता वाहनावर कुठलाही नंबर आढळला नाही. यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूर च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून अंदाजे दोन लक्ष रुपयाची दारू व वाहन असे एकूण 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अज्ञान आरोपीविरुद्ध गोंडपिपरी पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केलेली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी.बी. पटले हे करीत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून लगतच्या तेलंगाना राज्यातून दारू तस्करांनी अवैद्य दारू तस्करीचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालविला होता. या दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात गोंडपिपरी पोलिसांना मात्र सपेशल अपयश आले आहे. काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूर ने केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे चांगेलेच धाबे दणाणले असून एवढ्या मोठ्या तस्करी बद्दल गोंडपिपरी पोलीस अनभिज्ञ कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.