मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यास जिल्हयातुन सावली तालुका अव्वल.

Bhairav Diwase
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे मजुरांच्या हाताला रोजगार.
Bhairav Diwase.   May 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यात संचारबंदीमुळे काही प्रमाणात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शासनाकडुन महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे सुरू करण्यात आलेले आहे.तालुक्यात सर्व ५४ ग्रामपंचायतीमध्ये काम केली जात आहेत. महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे मजुरांचा हाताला रोजगार मिळाला आहे . एप्रिल २०२० पासून कामाला सुरुवात करण्यात आली सदयास्थितीत प्रतिदिवस ९ हजार ७६५ इतकी मजुर उपस्थिती असुन सावली तालुका जिल्हयातून मग्रारोहयो योजने अंतर्गत मजुरांना रोजगार पुरविण्यामध्ये अव्वल क्रमांकावर आहे.यामध्ये पांदन रस्ता मामा तलाव,बोडी खोलीकरण , नाला खोलिकरण,अंगणवाडी बांधकाम,वृक्ष लागवड,व वैयक्तीक स्वरूपाचे इत्यादी मिळून १४५ कामे सुरु आहे . सावली तालुक्यात कोविड-१९ एकही रुग्ण नसले तरी सर्वोतोपरी आवश्यक खबरदारी घेउनच योजने अंतर्गत कामे करण्यात येत आहेत.कामाच्या ठिकाणी मजुरांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.तसेच सॉनिटायजर व साबनाने हात धुण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.१ मिटर अंतर ठेवुन काम करने इत्यादी सुचना देण्यात आलेल्या आहेत.कामाच्या ठिकाणी गटविकास अधिकारी डॉ.अमोल भोसले , सहा.गटविकास अधिकारी निखील गावडे,विस्तार अधिकारी अनिरुध्द वाळके तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व तांत्रीक सहाय्यक यांनी कामाच्या ठिकाणी भेटी देउन मजुरांना मार्गदर्शन करीत आहेत.संकटकाळात गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने मजुरांना दिलासा मिळाला आहे. 
तालुक्यात लाकडाऊन मुळे मजुरांवर आलेली ऊपासमारी व अर्थ व्यवस्थेला चालना देन्यासाठी शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्यात आली. कोरोना वायरसने सन २०२० हा वर्षे राज्यासह देशाला हादरऊन सोडला.अन संचारबंदि लागु करन्यात आली . त्यामुळे मजुरांवर ऊपासमारीची वेळ ओढावली.मजुरांच्या हाताला काम मीळाव या ऊद्दात हेतूने सावली पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये मनरेगाच्या कामाला सुरुवात करण्यात आली . गावातील मजुर पहिल्यांदाच मोठ्या संख्येनी कामावर मोठ्या संख्येणी दीसुन येत आहेत.तालुक्यात कोरोनाचे रुग्न नसलेत तरीही आवश्यक खबरदारी घेऊनच मजुरांना कामावर घेतल्या जात आहे . तोंडाला मास्क किवा रुमाल बांधने,हात स्वच्छ धुने, सनिटायझरचा वापर करणे , सोशल डीस्टंसचे पालन करन्या संदर्भात मजुरांना सुचना देन्यात येत आहे.

"सावली तालुक्यामध्ये सर्व ५४ ग्रामपंचायमध्ये मनरेगाचे कामे सुरु आहेत.९ हजार ७६५ मजुरांना काम मिळाल्यामुळे समाधानी आहेत.रोजगाराच्या दृष्टिने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध कामांचा सेल्फ तयार करण्यात आलेला आहे.तसेच ऐवढया मोठया प्रमाणात मजुर उपस्थित मजुरांची मजुरी वेळेवर अदा करण्यात येत आहे.असुन १०० टक्के मजुरांची मजूरी वेळेवर अदा करण्यात येत आहे"
 -डॉ.अमोल भोसले 
गट सं.वि.अ.प.स.सावली

"सावली तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील जॉबकार्ड धारक व्यक्तीना मनरेगाची कामे करण्यासाठी जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून गावातच रोजगार पुरविण्याचा प्रयत्न आहे."
मा.विजय गुडडी कोरेवार
 सभापती प.स.सावली