आय एम ए च्या माध्यमातून गरिब गरजु पर्यंत आरोग्य सेवा पोहचवा - आ. किशोर जोरगेवार

Bhairav Diwase
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आमदार किशोर जोरगेवार यांची आय एम ए च्या पदाधिका-यांशी चर्चा.
  Bhairav Diwase.    May 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- कोरोनामूळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे चंद्रपूरकरांवर मोठे संकट कोसळले आहे. आय एम ए हे वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातीलही एक मोठे नाव आहे. त्यामूळे आजच्या या संकटकाळी आय एम ए ची भरीव कामगीरी असली पाहिजे. खाजगी रुग्णालये सुरु असले पाहिजे. आय एम ए च्या माध्यमातून गरीब गरजुपर्यंत आरोग्य सेवा पोहचली पाहिजे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी आय एम ए च्या पदाधिका-यांना दिल्यात. तसेच या कठिणकाळी सेवा देणा-या आशा वर्कर, घंटागाडी कर्मचारी यांच्याही आरोग्यासाठी आयएमएच्या माध्यमातून विशेष सुविधा देण्यात यावी असेही यावेळी आ. जोरगेवार यांनी सुचविले


     कोरोनाच्या पार्श्वभुमिवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आयएमएच्या पदाधिका-यांशी चर्चा केली तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयएमएच्या नवनियुक्त पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्यात या शुभेच्छा देत असतांना कोरोनाच्या संकटात नागरिकांना मदतीची अपेक्षाही व्यक्त केली.

           कोरोनाच्या दहशतीत जगत असतांना डॉक्टर कोरोना योद्धा म्हणून समोर आले आहे. नागरिकांच्याही डॉक्टरांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आय एम ए च्या नवनियुक्त पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. कोरोनाच्या संकटात जगत असतांना नागरिकांना आय एम एच्या माध्यमातून सेवा पुरविण्यात याव्यात असे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगितले. तसेच शासकीय आदेशानुसार सर्व खाजगी रुग्णालये सुरु राहतील याकडेही आयएमएने लक्ष देण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. आयएमएच्या माध्यमातून आजवर अनेक सामाजिक कार्य करण्यात आले आहे. मात्र आता संकटकाळी हे कार्य आणखी गतिशील करण्याची गरज असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगितले. कोरोनाचे संकटाशी लढण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नागरिक घरी राहून देशसेवा करत आहे. मात्र अशात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आशा वर्कर, सफाई कर्मचारी, पोलीस बांधव, घंटागाडी कर्मचारी अविरत सेवा देत आहे. त्यामुळे या सर्व कोरोनायोद्घानच्या आरोग्याची काळजी आयएमएने घ्यावी आयएमएच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबीर घेण्याच्याही सूचना आ. जोरगेवार यांनी केल्यात आयएमच्या पदाधिकाऱ्यांनीही ही सूचना मान्य केली आहे. यावेळी आय एम ए चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अनिल माडुरवार व सचिव डॉ सुरभी मेहरा यांची उपस्थिती होती.