Click Here...👇👇👇

सावली तालुक्याला गडचिरोलीला जाण्याचा मार्ग खुला करण्यात यावे.

Bhairav Diwase
1 minute read
सुनील बोमनवार यांची मागणी.
 Bhairav Diwase.   May 13, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: कोरोना वायरसचा देशात शिरकाव होताच सरकारने प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने टप्याटप्यात लाँकडाउन वाढवून १७ मे पर्यंत करण्यात आले . सरकार आणि प्रशासन योग्य ती खबरदारी घेऊन चंद्रपूर - गडचिरोली दोन्ही जिल्हे कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.मात्र सामान्य नागरिकांना या लाँकडाउनमुळे बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे .सावली तालुक्यातील वैनगंगा नदी लगतच्या गावातील
नागरिकांचे बरेच व्यवहार गडचिरोली जिल्ह्याशी येत असल्याने यात सर्वसाधारण कामगारांना आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे . यात तालुक्यातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यातील दुकानातील कामगार,घर बांधकाम मिस्त्री,खाजगी दवाखान्यात जाणारे,गॅस कनेक्शन धारक,पाँवर स्टेशनला काम करणारे कामगार , असे बरेच काम करणारे मजूर वर्ग गडचिरोली मुख्यालयात जात होते . अशांचे सगळे व्यवहार लाँकडाउन मुळे बंद पडले असून उपासमारीची वेळ या सर्व कामगारांवर आली असून शासनाने योग्य ती नियमावली करुन सावली तालुक्याला गडचिरोली मुख्यालयी जाण्याची परवानगी द्यावी . चंद्रपूर आणि गडचिरोली दोन्ही जिल्हे ग्रीन झोनमध्ये येत असून सावली तालुका कोरानामुक्त आहे . म्हणून गडचिरोली मुख्यालयी जाण्यासाठी काही अडचण नाही . अशी मागणी श्री किसान सहकारी भात गिरणीचे अध्यक्ष तथा सावली तालुका पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष सुनील बोमनवार यांनी केली आहे.