🔵बाहेर राज्यातुन आलेल्या कोरांटाईन असलेल्या मजुरांना भेटून मास्क आणि बिस्किटे वाटप.
🔵अपंग निराधार लोकांसाठी मदतीचा हात समाजातून पुढे करण्याचे आव्हान कु अल्का आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी केले.
Bhairav Diwase. May 13, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा: काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा जरी एक ही रुग्ण आढळून आलेला नसला, तरी प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. कु अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती. पोंभुर्णा तालुक्यातील केमारा, भटारी, देवई येथे गावभेटी देण्यात आली. अशा अपंग निराधार लोकांसाठी मदतीचा हात समाजातून पुढे करण्याचे आवाहन अल्का आत्राम यांनी केले त्यावेळी केमारा गावातील संगीता कन्नाके ही मुलगी दोन्ही हातांनी पायानी अपंग आहे तिचे आई वडील आधीच देवाघरी गेले. सांभाळणारा भाऊ होता, त्यांचा पण २ वर्षे आधी मृत्यू झाला. अशी अपंग निराधार मुलीला कु अल्काताई आत्राम यांचे कडुन धान्य, कपडे आणि आर्थिक मदत करण्यात आली. तसेच बाहेर राज्यातुन आलेल्या कोरांटाईन असलेल्या मजुरांना भेटून मास्क आणि बिस्किटे देण्यात आली. या परिस्थितीत संगीता सारख्या लोकांना मदतीचा हात समाजातून पुढे यायला पाहिजे. यावेळी प्रेमदास इष्टाम, रमेश वेलादी, गोपाल आत्राम, प्रशांत मंडरे उपस्थित होते