बाहेर राज्यातून आलेल्या मजुरांनी मानले सुधीर भाऊ यांचे मानले आभार.

Bhairav Diwase
गावभेटी व बोर्डा झुल्लुरवार आणि बोर्डा बोरकर या गावात बाहेर राज्यातून आलेल्या मजुरांना कु अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी दिली भेट.
Bhairav Diwase.     May 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोणा महामारीमुळे आंध्रप्रदेश येथे पोभुर्णा तालुक्यातील असंख्य मजुर मिरची तोडण्यासाठी गेले होते. आणि कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर लाँकडाऊन लागल्याने हातचे कामही गेले. गावाकडे परत पण येता येत नव्हत. त्यामुळे मजुरावर उपासमारीची वेळ आली. बाहेरून राज्यातुन आलेल्या लोकांना गावात प्रवेश देत नव्हते. वादळ वारा गारा सहित पाऊस पडायचा. यावेळी डोक्यावर पाल हातानी पकडुन ही लोक शेतात राहत होती. त्यानी आपली आपबिती कु अल्का आत्राम यांना फोन करुन सांगितले. तर काही जण विडिओच्या मार्फत सांगितले. त्यांनंतर कु अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी मा. आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना त्या मजुरांची माहिती दिली.

न्युज व्हिडिओ पहा:-  https://youtu.be/gzHE3-omusE

         त्यानंतर मा. आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून लोकांना तात्काळ मदत झाली. मा. आ सुधिरभाऊ यांच्या माध्यमातून बाहेर राज्यातुन येणार्‍या मजुरांना गावापर्यंत सोडण्यासाठी गाड्याची व्यवस्था करण्यात आली होती. कु अल्का आत्राम स्वतः ५ दिवस आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर असलेल्या पोडसा पुल येथुन लोकांना गावात सोडण्यासाठी व्यवस्था बघत होती. त्यांच्या सोबत विनोद देशमुख होते.  मा. आ सुधीरभाऊच्या माध्यमातून पोभुर्णा, मुल येथील मजुर गावागावात पोहचविण्याचे काम करण्यात आले. म्हणून आज गावभेटी व बोर्डा झुल्लुरवार आणि बोर्डा बोरकर या गावात बाहेर राज्यातून आलेल्या मजुरांना भेट दिली. कु अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांचे कडुन मास्क, बिस्किटे वाटप करण्यात आले. या दरम्यान मजुरांनी मा. आ सुधिरभाऊ यांचे मनापासून आभार मानले.