१०५ रक्तदात्यांनी नोंदविला सहभाग.
Bhairav Diwase. May 10, 2020
गोंडपिपरी:- कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे याचे गांभिर्य लक्षात घेत आमदार सुधीर मुनगंटीवार ह्यांनी चंद्रपूर येथे रक्तदान शिबिर सुरू केले होते. ह्यापासुन प्रेरणा घेत आज गोंडपीपरी येथे माता कन्यका परमेश्वरी देवस्थानात गोंडपीपरी तालुका भाजपा कडून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात गोंडपीपरी तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक अशा सर्व मिळून १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या रक्तदात्यांना मास्क घालून तसेच हाताला सॅनिटायझर लावून करण्यात आली त्यानंतर देवराव भोंगळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली तसेच त्यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कडून भिंतीवरील घड्याळ भेट स्वरूपात देण्यात आली आणि रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले.
न्युज व्हिडिओ:--- https://youtu.be/vEnDA_pq1ks
यावेळी बबन निकोडे, निलेश संगमवार, स्वाती वडपेलीवार, वैष्णवी बोडलावार, कल्पना अवथरे, सुनीता येग्गेवार, चेतन गौर , राकेश पुन, साईनाथ मास्टे, अमर बोडलावार, गणेश डहाळे, आश्विन कुसनाके, स्वप्नील बोनगीरवार, नाना येलेवार, अरुण कोडापे, निलेश पुलगमकार, गणपत चौधरी, मनीष वासमवार, विनोद नरेदुलवार, विनोद देशमुख, संजय झाडे, सुनील फुकट, वैभव बोनगीरवार यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.