सावली तालुक्यातील अवैध रेती साठा जप्त.

Bhairav Diwase
सावली तहसीलदाराची मोठी कारवाई.
 Bhairav Diwase.   May 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-  कोरोनाच्या प्रभावामुळे अडकलेले तालुक्यातील अनेक मजूर तेलंगाना राज्यातून परत आल्याने मजुरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. याची पाहणी करण्याकरिता सावलीच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे यांनी कापसी येथे (दि. 06/05/2020) रोजी गेल्या असता गावात अवैध रेती साठवणूक केली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यानुसार अवैध रेती साठ्यावर धाड टाकून सुमारे 283 ब्रास रेती जप्त केली आहे.
सावली तालुक्याला वैनगंगा नदीचे पात्र लागून आहे. त्यामुळे रेती तस्कर वैनगंगेच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैद्य वाहतूक करीत असतात. तालुक्यातील कापसी येथे रेती तस्करांनी चोरटी वाहतूक करून रेतीचा अवैद्य  साठा मोठ्या प्रमाणात केल्याचे निदर्शनास आले. यावरून तहसीलदारांनी धाड टाकून सर्व साठे जप्त केले. त्यात कापसी येथे 223 ब्रास, भान्सि येथे 20 ब्रास, सोनापूर येथे 40 ब्रास अशा अवैध रेतीच्या साठ्याचा समावेश आहे.
 तालुक्यात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक होत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे रेती तस्करांकडुन मोठमोठे साठे केल्याचे निदर्शनास  येते. कापसी येथील अवैध रेती साठा नेमका कोणाचा आहे?  हे मात्र न उलगडणारे कोडेच आहे.  या बाबतीत अजूनही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष. चौकशीमध्ये कोणावर कारवाई होणार याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून व शासनाचा महसूल बुडवून अवैध रेतीची साठवणूक होत आहे. याला जबाबदार कोण?  असा सावाली तालुक्यातील जनता करू लागली आहे.दरम्यान या अवैद्य साठ्यात अनेक स्थानिक राजकीय पुढारी सहभागी असल्याची कुजबुज गावकऱ्यात असल्याचे बोलले जात आहे.