चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतून ब्रम्हपुरी व नागभीड तालुका वगळावा. :- ब्रम्हपूरी सावली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांची मागणी.

भाजपा नेते, माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी. पालकमंत्र्यानाही दिले पत्र.
     Bhairav Diwase.   May 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कक्षामध्ये ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. चिमूर हे ठिकाण ब्रम्हपुरी पासून ७५ कि.मी तर नागभीड पासून ५६ कि.मी च्या अंतरावर आहे. तसेच चिमूर ला जाण्याकरिता रेल्वे मार्ग ही नाही. 
ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यातील जनतेला चिमूर हे ठिकाण कार्यालयीन कामकाजासाठी सोयीचे नसल्याने, ब्रम्हपुरी,सावली विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कक्षेतून ब्रम्हपुरी व नागभीड तालूका वगळण्याची मागणी माजी मंत्री आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे. या संदर्भात प्रा.अतुल देशकर यांनी माजी मंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री विजयजी वडेट्टीवार यांना पत्रा द्वारे मागणी केली आहे.
कोर्ट, एस.पी ऑफिस, सहकार क्षेत्रातील सर्व कार्यालये, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन इ. सर्व कार्यालये चंद्रपूरातच आहेत. चंद्रपूर ला जायला माफक दरात रेल्वे ही उपलब्ध आहे. चिमूर येथे फक्त महसूल कार्यालयीन कामकाजासाठी जाणे सर्वसामान्य माणसाला आर्थिक दृष्ट्या न परवडणारे व गैरसोयीचे आहे. म्हणून ब्रम्हपुरी व नागभीड हे दोन्ही तालुके यातून वगळण्यात यावे अशी मागणी प्रा.अतुल देशकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने