Click Here...👇👇👇

मुल तालुक्‍यातील उथळपेठ येथे 300 कुटूंबांना जिवनाश्‍यक वस्‍तुंच्‍या किटचे वितरण.

Bhairav Diwase
आ. मुनगंटीवार हे खरे लोकनेते – सरपंच पलिंदर सातपुते
Bhairav Diwase.    June 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
 मुल:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल तालुक्‍यातील उथळपेठ या गावात जिवनाश्‍यक वस्‍तुंच्‍या किटचे वितरण करण्‍यात आले. लॉकडाऊनच्‍या पार्श्‍वभुमीवर अजुनही उथळपेठ या गावातील नागरिक स्थिरस्‍थावर झालेले नाही. येथील नागरिकांनी आ. मुनगंटीवार मदतीची मागणी केली व आ. मुनगंटीवार यांनी तातडीने भाजपा पदाधीका-यांच्‍या माध्‍यमातुन मदत पाठवुन उथळपेठ येथील नागरिकांना दिलासा दिला.
आज दि. 7 जुन 2020 रोजी भाजपा नेते प्रकश धारणे, उथळपेठचे सरपंच पलिंदर सातपुते, दत्‍तप्रसन्‍न महादानी, उज्‍वल धामनगे यांनी या सदर गावात जावुन 300 कुटूंबांना जिवनाश्‍यक वस्‍तुंच्‍या किटचे वाटप केले. या किट मध्‍ये धान्‍य, मिठ, बिस्‍कीट, साबण, मास्‍क आदी वस्‍तुंचा समावेश आहे. नागरिकांनी केलेली प्रत्‍येक मागणी आ. मुनगंटीवार यांनी नेहमीच प्राधान्‍याने पुर्ण केली आहे. विकासकामे असो वा अन्‍य कोणतीही न्‍यायोचित मागणी असेल नागरिकांना दिलेला शब्‍द त्‍यांनी नेहमीच पुर्ण केला आहे. आ. मुनगंटीवार हे खरे लोकनेते असल्‍याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना सरपंच पलिंदर सातपुते यांनी व्‍यक्‍त केली. उथळपेठ या गावात त्‍यांच्‍या माध्‍यमातुन अनेक विकासकामे पुर्णत्‍वास आली आहेत. आम्‍ही त्‍यांचे कायम आभारी राहु असेही श्री. सातपुते यावेळी बोलताना म्‍हणाले.