Click Here...👇👇👇

मा लोकनेते श्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून त्या रक्तदात्यांना किट व भेटवस्तू देऊन सन्मानित.

Bhairav Diwase
मा श्री लोकनेते आम श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने श्री गजानन गोरंटीवार भाजपा अध्यक्ष पोंभुर्णा  तालुका यांनी रक्तदात्याचे मानले आभार.
Bhairav Diwase.   June 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यात दि 31:5:2020 रोज रविवार ला चिंतामणी काँलेज पोंभुर्णा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माननीय श्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसारआज दिनांक 07/06/2020 रोज रवीवार भाजपा कार्यालय पोंभुर्णा येथे नियमाच्या अधीन राहून त्या रक्तदात्यांना किट व प्रशस्तीपत्र तसेच भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. भारतीय जनता पार्टी  पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने श्री गजानन गोरंटीवार भाजपा अध्यक्ष तालुका पोंभुर्णा, श्री राहुलभाऊ संतोषवार सदस्य जिल्हा परिषद चंद्रपुर, श्री. अजीत मगळगीरीवार  नगरसेवक हस्ते किट, प्रशस्तीपत्र व भेट वस्तूचे वितरण  करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती सुरेशजी पेद्दुलवार विस्तारक, प्रजोत कडु चंद्रपुर, मोहन चलाख नगरसेवक, दिलीप म्याकलवार सर, महेन्र्द वनकर, धिरज गुरुनुले, शंकर मरचट्टीवार, राजु ठाकरे, इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या लोकहिताच्या कार्याला रक्तदात्यांनी भरभरून सहकार्य केल्याबद्दल मा श्री लोकनेते आम श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने श्री गजानन गोरंटीवार  भाजपा अध्यक्ष पोंभुर्णा  तालुका यांनी रक्तदात्याचे आभार मानले.