Click Here...👇👇👇

सावली येथून जवळ असलेल्या चकपिरंजी येथील युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

Bhairav Diwase
मृतक हा कुटुंबातील कर्ता असल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले.
Bhairav Diwase.   June 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली येथून जवळ असलेल्या चकपिरंजी येथील युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. योगेश वसंत राऊत (30 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी मृतक हा दवाखान्यातुन औषध उपचार करून घरी परत आला होता लागलीच त्याची प्रकुर्ती बिघडल्याने घरी कुणाला न सांगता रविवारी सकाळी 7:30 च्या दरम्यान चकपिरंजी येथील वालकर यांच्या शेतालगत विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृतक हा गेली अनेक वर्षांपासून पोटाच्या अल्सर या आजाराने पीडित असल्याचे कुटुंबियाकडून सांगितले जात आहे. कुटूंबाची परिस्थिती हालाकीची आल्याने सदरच्या आजारावर योग्य उपचार होऊ शकला नाही.
मृतक हा कुटुंबातील कर्ता असल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मृतकाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.
मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आईवडील, भाऊ असा आप्त परिवार आहे.