पाथरी पो. स्टे. अधिकारी श्री घारे साहेब यांनी सूत्रे हातात घेऊन करीत आहेत कडक तपास.
Bhairav Diwase. June 07, 2020
सावली:- सावली तालुक्यातील कसरगाव येथे सौ. लोभीना मनेष भोयर वय 23 नामक महिलेचा मृतदेह बापूजी हुलके यांच्या शेतशिवारातील विहिरीत आढळल्यानंतर पोलीस प्रशासनाला कुठलीही माहिती न देता सासरकडच्यांनी जाळून अंत्यविधी केला. सदर महिला ही सावली तालुक्यातील जिबगाव येथील श्री सुरेश मेश्राम यांची मुलगी असून तीन वर्षांपूर्वी कसरगाव येथील श्री मनेष भोयर यांचेशी विवाह करण्यात आला होता. संसाराचा गाडा सुखात सुरु असताना मधेच घात झाला. लोभीना ही अचानक घरातून बेपत्ता झाली. ही माहिती लोभीना हिच्या सासरकडच्यांनी द्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी दिली नाही. जिबगाव येथील दुसरी महिला त्याच कसरगाव मध्ये होती त्यांनी माहिती देताच मृतक लोभींनाचे आई वडील लगेच कसरगाव येथे पोहचले व मृतक लोभींनाचा शोधाशोध सुरु झाला असता कसरगाव येथील श्री बापूजी हुलके यांच्या शेतातील विहिरीत सौ. लोभींनाचा मृतदेह आढळून आल्याने सौ. लोभींनाच्या आई वडिलांना धक्का बसून काय करावे हे त्यांना सुचेनासे झाले. सौ. लोभींनाच्या सासरकडच्यांनी लगबगीने लोभींनाचा मृतदेह विहिरीतून काढून लगेच अग्नी देऊन तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला. या घटनेची माहिती कसरगाव येथील पोलीस पाटील यांनी पाथरी पोलीस विभागाला द्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी सुद्धा घटनेची माहिती पोलीस विभागाला दिली नाही. दि. 05/06/2020 ला घटनेची माहिती मिळताच पाथरी पो. स्टे. अधिकारी श्री घारे साहेब यांनी स्वतः जिबगाव येथे श्री सुरेश मेश्राम यांचे घरी जाऊन तक्रार देण्याचे सांगितले असता दि. 06/06/2020 रोजी मृतक लोभींनाचे आई वडील यांनी झालेल्या घटनेची तक्रार पोलीस विभागाला देऊन माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच आहे असा आरोप करीत पोलीस स्टेशन पाथरी येथे इनकॅमेरा व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनुज तारे साहेब यांचेकडे तक्रार दाखल केली. घटनेची चौकशी करण्याकरिता तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनुज तारे साहेब यांच्या मार्गदर्शनातं तपासाची सूत्रे स्वतः पाथरी पोलीस स्टेशनचे अधिकारी स. पो. नि. श्री घारे साहेब यांनी हातात घेऊन लोभींनाच्या सासरकडील 5 व्यक्तीवर कलम भा. द. वि. 306, 498 (अ )34 अन्वये गुन्हा दाखल करीत पुढील तपास अतिशय गंभीर व कडक रित्या करीत असून मृतक लोभींनाच्या आई वडिलांना न्याय मिळेलच असा तपास करीत असल्याचे सांगितले असता मृतक लोभीना यांचे आई वडील व नातेवाईक यांच्या मनातील गैरसमज दूर झाला असून पाथरी पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री घारे साहेब यांचे आभार व्यक्त केले आहे.