पोंभुर्णा शहरातील लाभाथी तथा प्रस्थावीत असणाऱ्या लाभार्थी यांनी मानले आभार.
Bhairav Diwase. June 06, 2020
पोंभुर्णा:- पोंभुर्णा शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना प्रत्येक नागरिकांना घरकुल मंजूर केल्याने शहरातील जनता अत्यंत सहानुभूती पूर्वक समाधान व्यक्त करत आहे. परंतु घरकुल लाभार्थ्यांना पहिले देयक नगरपंचायत पोंभुर्णा कडून अदा करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम चालू केले आहे. बहुतांश बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. देयका अभावी काही लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहेत. लाभार्थ्यांना उर्वरित देयक बाकी आहे. कोरोना सुदृष्ट परिस्थितीत उर्वरित अनुदान प्राप्त झाले नाही या सबबीखाली लाभार्थ्यांना उर्वरित देयाका करिता वारंवार नगरपंचायत चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे चित्र दिसत आहे. कारण बहुतांश लाभार्थी भाड्याने राहून घरकुल बांधकाम करीत आहे. पावसाळ्याचे दिवस नजदीक आलेले आहे. प्रत्येक जण आपापले घरटे पूर्ण कधी होईल याची वाट पाहत आहे. अशातच कोरोना सुदुष्ट परिस्थितीत लॉकडाउन मुळे लाभल्यामुळे मुद्दतीत होणारे बांधकाम करण्यास वेळ लागत आहे. लाभार्थ्यांचे देयका अभावी पंतप्रधान आवास योजनेचे काम थांबले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी आम्ही घरकुल बांधकाम कधी करायचे? याबाबत विचारणा करीत आहेत. नगरपंचायत पोंभुर्णा तर्फे वैयक्तिक लाभाच्या योजनेत पंतप्रधान आवास योजना ही एक प्रभावी योजना असून आपल्या सहकार्यातून सदर योजना पुण्यात प्रभावीपणे राबवली जात आहे. परिस्थितीनुसार आलेल्या घरकुल संदर्भातील वरील अडचणी आपल्या स्तरावर तात्काळ निरंकार करून जुन्या लाभार्थ्यांचे उर्वरित देयक व नवीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचा अध्यादेश काढून मिळावी.
दिनांक 02 जून 2020 ला माजी वित्त व नियोजन तथा वनमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना नगरपंचायत पोंभुर्णा चे नगरसेवक श्री मोहन चलाख यांनी निवेदन दिले होते.
सदर निवेदनाची दखल घेऊन मान. श्री. आ सुधीरभाऊ मुनगंटीवार लोकप्रिय आमदार तथा माजी वित्त व नियोजन तथा वनमंञी, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांनी नगरपंचायत पोंभुर्णा चे नगरसेवक श्री मोहन चलाख यांच्या पञाची दखल घेऊन राज्य सरकार तथा शासनाचे प्रतिनिधी कडे पोंभुर्णा शहरातील प्रधानमंञी आवाज योजनेचे थकीत रक्कम मिळण्याबाबत आणि नवीन प्रस्तावीत असलेले फाईल लवकरात लवकर मंजूर करून तात्काळ काम चालू करण्याचे निर्देश देण्याबाबत दिनांक 02 जून 2020 ला निवेदन देण्यात आला. त्या निवेदनाची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. सर्व पोंभुर्णा शहरातील लाभाथी तथा प्रस्थावीत असणाऱ्या लाभार्थी यांनी आभार मानले.