जनसेवा हीच ईश्वर सेवा-हरीश शर्मा
मा.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपुर विधानसभा क्षेत्रामध्ये रूग्णालयासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात एकुण 13 आॅटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
Bhairav Diwase. June 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आज दि.30 जुन रोजी पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आॅटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण मा.श्री.हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपुर व जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपुर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या व मा.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांच्या माध्यमातुन आम्ही मदतकार्य सुरू केले आहे. प्रारंभीच्या काळात भोजनाचे डबे, धान्य व जीवनावश्यक वस्तुंच्या किट्स, सॅनिटायझर, मास्क, डेटॉल साबण आदींचे वितरण, पोलिसांसाठी, पोस्टमन, सलुन व्यावसायिक यांच्यासाठी सुरक्षा किट अशा विविध माध्यमातुन आम्ही नागरिकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे असे हरीश शर्मा म्हणाले.
यावेळी श्री.गजानन गोरटींवार अध्यक्ष भाजपा पोंभुर्णा, सौ.श्वेताताई वनकर अध्यक्ष,न.पं पोंभुर्णा, सौ.रजिया कुरेशी उपाध्यक्ष,न.पं.पोंभुर्णा, श्री.गोजे साहेब प्राथमिक आरोग्य केद्र अधिकारी पोंभुर्णा, श्री.अजित मंगळगीरीवार नगरसेवक, सौ.ज्योतीताई बुंराडे उपसभापती प.स पोभुर्णा, सौ.सुनिताताई मॅकलवार नगरसेविका, श्री.मोहन चलाख नगरसेवक, सौ.शारदाताई कोडापे नगरसेविका, श्री.आदित्य तुम्मलवार महामंत्री भा.ज.पा युवा मोर्चा पोंभुर्णा, श्री.गजानन मुम्डवार, श्री.संजय कोडापे श्री.अजित जंबुलवार, श्री.महेद्र सोनुले व सर्व पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.